Thursday, May 27, 2010

इक श्वास

मला हवा होता इक श्वास,
हृदयात धडकणारा,
रक्तात मिसळून धमन्यांमध्ये वाहणारा........
मला हवा होता इक श्वास,
मला एकरूप ठेवणारा
माझा एकांत नेहमीच दूर ठेवणारा .........
मला हवा होता इक श्वास,
हा अंतरतात्मा सुखावणारा,
साऱ्या वेदना शमवणारा..........
मला हवा होता इक श्वास
इक विचार म्हणून जगणारा
केवळ आत जाऊन बाहेर न येणारा...........
मला हवा होता इक श्वास
हृद्याच ठोका होणारा
नसेल जरी आत्मा तरी
ह्या हृधायात धडकणारा.......

Thursday, May 13, 2010

कर्माच कर्ज

आपल्याही आयुष्यात काही गोष्त्ती आपल्या हि नकळत घडत असतात,घडलेला गोष्टीचे आपण गुणोत्तर मांडत बसतो. पाप आणि पुण्यचा हिशोब मांडत असतो . खरंच हे आपल्या सोबतच का घडलं याचा विचार करत करत आपण त्या देवालाच प्रश्न विचारत असतो. का घडल असाव हे सार माझ्या बाबतीत ? असा प्रशा मला हि पडला आणि मी पण त्या देवाला हाच प्रश विचारला? ...................................................
या वेळस मात्र त्याने मला उत्तर देला होत. का कुणास ठाऊक ह्या ओळी कशाकाय सुचल्या आणि मला माझं उत्तर मिळालं..........................................(मला माझी सर्वात जास्त आवडलेली हि कविता आहे)


कर्माच कर्ज !

तुझ्या मंदिराव फडकणारा तो भगवा झेंडा
माणसांची लागलेली रांग आता बसून बघणारा
कर्मांचा तू सावकार आत्मा
नियमाप्रमाने प्रमाणे घंटानाद करायचा
तुझ्या पायावर डोकं तेवून आपल्या कर्माचा
हिशोब मांडायचा,
जाताना खडी साखरेचे दोन दाने हातात देऊन
परत ये म्हणून तू सांगायचा ...............................||
रोजचच झाले होते हे ,
आपल्या जीवनाच्या शेतात राब राब राबायच
कर्माच पिकं आले कि तू तुला नैवेद्य व्हायचा
नेहमी प्रमाणे घंटानाद करायचा
तुझ्या पायावर डोकं ठेऊन आपल्या
कर्माचा हिशोब मांडायचा ...................................||
मग तू हिशोब सांगायचा
ह्या जन्मीच्या पुण्य कर्माच्या पिकातून
मागच्या जन्माचं पाप कर्म कर्ज फेडून घ्यायचा
हातात साखरेचे दोन दाने देऊन परत
ये म्हणून सांगायचा, ...................................||
फेडता फेडता आता शेवटचाच घंटानाद होता
राहिलेल्या कर्जाचा शेवटचाच हफ्ता होता
कर्माच पिक कसा डोलत होतं
मनामध्ये समाधानच पाट वाहत होता
आलो होतो तुला शेवटचा नैवेद्य वाहायला
तुझ्या पायावर डोक ठेऊन हिशोब मांडायला ......................||

तुझ्या पायावर डोक ठेवल
तर तू म्हणाला
" तिकडे जाळले आहे कुणीतरी,
तुझ्या कर्माच पिक,
जळून राख झालय,
तुझं कर्ज आता व्याजाने वाढल आहे"
.........................................
................ का केलसं रे अस !
तुला विचारलं तर म्हणाला
"मागच्या जन्मी दिली होती सूट,
त्या जन्माची पाप कर्म या जन्मात फेडायची,
या जन्मात नाही मिळणार सूट पुढच्या जन्मी फेडण्याची"

Monday, May 10, 2010

काय लिहाव

मला तास ब्लोग वर लिहण कठीणच होत. नेहमी प्रमणे वही आणि पेन उचलायचा आणि लिहायला सुरवात. मी लिहितो, काही वाटलच, सुचल, आणि जे काही मी बोलू शकत नाही ते सारच वहीत लिहून ठेवतो . खरतर ब्लोग लिहान्यचे कारण कि "तू छान लिहितोस, जेव्हा जेव्हा लिहिशील तेव्हा तेव्हा मला वाचल्या देत जा" अशा ठणकावून सांगणार्या, माझ्या मैत्रणी साठी.

"लिहायचं म्हटला तर काहीहि लिहिता येत नाही,
लिहिल्या शिवाय विचारानं अस्तित्व येत नाही
वाचण्यारच सोडा हो, लिहिणारा स्वतालाच समजू शकत नाही ,
समजू शकत नाही म्हणून काय झालं,
पण लिहणं काही सोडता येत नाही,"