चार वर्ष झाली तुझ्या माझ्या
ह्या प्रेमाच्या रोपट्याला
नाही म्हणता म्हणता
बिजान्ग्कुरातून रोपट व्हायला.........
आठवतं का तुला.......
सगळ्याचा चोरून पेरलं होतं
हे तुझं माझं "बी "...........
उद्याची स्वप्नं पाहत पाहत
याला घातलं होतं आपण
खत पाणी .......
चार वर्ष झाली तुझ्या माझ्या
ह्या प्रेमाच्या रोपट्याला
नाही म्हणता म्हणता
बिजान्ग्कुरातून रोपट व्हायला.........
रोजच भेटायचो आपण
ह्या पेरलेल्या बिजान्कुरापाशी
पेरलेल्या बी च रोपट पाहण्यासाठी ...........
चार वर्ष झाली तुझ्या माझ्या
ह्या प्रेमाच्या रोपट्याला
नाही म्हणता म्हणता
बिजान्ग्कुरातून रोपट व्हायला.........
एकमेकांचा हातात हात घेऊन
घातलं होतं छत याला
एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेऊन
भर दुपारच्या उन्हात आपल्या
सावलीने प्रेम केला होतं या रोपट्याला ..........
चार वर्ष झाली तुझ्या माझ्या
ह्या प्रेमाच्या रोपट्याला
नाही म्हणता म्हणता
बिजान्ग्कुरातून रोपट व्हायला.........
साकारलं होत इक स्वप्नं
उद्या नसणाऱ्या तुझ्या माझ्या
अस्तित्वाचं
बिजान्कुरातून एक रोपट होण्याच.......................
Thursday, July 29, 2010
प्राजक्त
रिमझिम पडणाऱ्या ह्या पावसाच्या धारा आणि
तुझ्या अंगणात पडलेला हा प्राजक्ताचा सडा
रिमझिम सरीत मध्ये भिजणारा मी
भिजणाऱ्या मी ला बघणारी तू ....
भिजून सुधा तुझ्या भेटीसाठी कोरडा
असणाऱ्या मी
मला पाहून माझ्या भावनेने भिजणारी तू .....
तुला पाहून ओंजळीत पावसाचे थेब जमवणारा मी
माझ्या भरलेल्या ओंजळी कडे पाहून सुखावणारी तू .....
सुखावाणाऱ्या तुला पाहून मी हि इक निस्तब्ध
पुतळा व्हायचं ..................
तू मात्र अंगान्तल्या प्राजक्ताला ओंजळीत घ्यायचं
माझ्या कडे बघत बघत, हसत हसत
ओंजळीत घेतलेल्या फुलांना हुंगत त्यांचीशी संवाद साधायचा
आणि म्हणायची.....................................
"सावळा होता तो कृष्ण जाने
राधेला वेड लावलं होतं
प्राजक्त आवडतो म्हणून स्वताला
तिच्या प्रेमात नाहून घेतलं होतं"

Friday, July 16, 2010
इक सिगरेट
माझ्या हातातली सिगरेट जेव्हा जळायची
का कुणास ठाऊक तूच का आठवायची
सिगारेटचा धूर धुक व्ह्याचा
अचानक धुकातून तूच समोर यायची
माझ्या हातातली सिगारेट विझवायची
धुरासारखा नको वाऱ्यासारखा जग
जाताना सांगून जायची
माझ्या हातातली सिगरेट जेव्हा जळायची
का कुणास ठाऊक तूच का आठवायची................
आज सिगरेट जाळून संपली होती,
तिचं अस्तित्व माझी दोन बोटं जाळून ,
कायमचं ठेऊन गेली होती,
सारच पाकीट जळून संपणार होत,
जळणारा धूर धुक होऊन सुद्धा ,
तू काही आली नव्हती........................................
आता शेवटचीच सिगारते पेटवली होती,
सिगारेटच्या पाकिटात इक चिट्ठी ,
अचानक दिसली होती.
चिट्ठी होती तुझीच माझ्या नावानं लिहिलेली......
" मला माहित आहे तुला सिगारेट चा व्यसन नाही आहे,
व्यसन आहे ते माझा आणि त्या साठीच होता हे सिगरेटच जळणं,
मलाहि तुझ्या आयुष्यात यायचं होत पण व्यसन म्हणून नाही,
कदाचित माझ्या मुळे तू या सिगरेटचा व्यसनी होशील आणि
स्वताच्याच आयुशाचा धूर करशील.....,
म्हणून मी आता कधीच येणार नव्हते,
हे वाचताना तुझा हातात शेवटचीच सिगरेट असेल.
तिला आता तू स्वतःहा विझव,
धुराचे आयुष सोडून वाऱ्याचे आयुष जगायला सुरवात कर"....
माझ्या हातातली सिगरेट विझली होती
माझा बोट जाळून तिचं अस्तित्व कायमचं ठेवून गेली होती.

Subscribe to:
Posts (Atom)