माझ्या विचारांना मी कागदाचं घर दिल होत,
आश्रयाच घर जरी कागदाचं होत,
स्वरूप मात्र कवितेच होत,
ज्याला गद्य,पद्ययाच अंगण नव्हत,
स्वल्पविराम,पूर्ण विरामाच बंधन नव्हत,
कुणीतरी टोकेल म्हणून या आश्रयाला,
वहीतच दडवल होत.
मला कुठे कविता करण्याच कौतुक हव होत,
हे तर विचारांनी मांडलेल्या,
आराखड्याच रूप होत,
नसेल कुणी सोबतीला तेव्हा
स्वताच्या मनातील प्रेक्षणीय,
स्थळ शोधण्यासाठी लागणार
नकाशाच पण होत.
माझ्या विचारांना मी कागदाचं घर दिल होत,
आश्रयाच घर जरी कागदाचं होत
स्वरूप मात्र कवितेच होत.
Friday, October 29, 2010
Wednesday, October 20, 2010
प्रेमाचा आरोप
हा साराच तारुण्याचा खेळ असतो
फुलांचे कौतुक करण्याचा ह्याच वयात जास्त वाव असतो,
आपल्याही नकळत, चंद्र तारे आपल्या नजीकचे वाटतात,
त्यांच्या असण्या नसण्याने तारुण्याचे रूप बदलतात.
ऐन मध्यातात वाऱ्याचा वाहन होतं
मनात दडलेल्या गोष्टी पोहोचवण्यासाठी
त्याच्याही वाटाचा उपयोग होतो.
ह्याच वाटांवर दिवसा मागून दिवस जातात,
रोज उगवणाऱ्या सूर्याचे मात्र
इकाच संध्याकाळी सारे निरोप होतात,
मग कुठे होते एकताची ओळख
कातरवेळेला आता ह्याच्या सोबतच बैठक
हे वाचानारयांचे मात्र माझावर "प्रेमाचे " आरोप.
फुलांचे कौतुक करण्याचा ह्याच वयात जास्त वाव असतो,
आपल्याही नकळत, चंद्र तारे आपल्या नजीकचे वाटतात,
त्यांच्या असण्या नसण्याने तारुण्याचे रूप बदलतात.
ऐन मध्यातात वाऱ्याचा वाहन होतं
मनात दडलेल्या गोष्टी पोहोचवण्यासाठी
त्याच्याही वाटाचा उपयोग होतो.
ह्याच वाटांवर दिवसा मागून दिवस जातात,
रोज उगवणाऱ्या सूर्याचे मात्र
इकाच संध्याकाळी सारे निरोप होतात,
मग कुठे होते एकताची ओळख
कातरवेळेला आता ह्याच्या सोबतच बैठक
हे वाचानारयांचे मात्र माझावर "प्रेमाचे " आरोप.
Subscribe to:
Posts (Atom)